23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयलघुग्रहाला धडक देणार यान

लघुग्रहाला धडक देणार यान

एकमत ऑनलाईन

पृथ्वीला वाचविण्यासाठी नासाचे मोठे मिशन
न्यूयॉर्क : दर महिन्यात एक दोनवेळा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याच्या बातम्या नेहमीच येतात. असे लघुग्रह बहुतांश वेळा पृथ्वीपासून दूरवरून किंवा अगदी जवळून जातात. सध्या पृथ्वीवरील जीवाला सर्वाधिक धोका अंतराळातील लघुग्रह किंवा अशनींपासून आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असेल, तर त्याची दिशा बदलली पाहिजे अन्यथा प्रलयाचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यासाठी नासाने गेल्या वर्षी डार्ट मिशनची सुरुवात केली. पुढच्या महिन्यात २६ तारखेला हे मिशन लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणार आहे.

पृथ्वीला लघुग्रहाच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी हे अंतराळ यान दूर अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहाला धडक देणार आहे. अशा टकरीमुळे लघुग्रहाच्या दिशेत बदल होऊ शकतो की नाही, याचा अभ्यास करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. हे यान या लघुग्रहाला २३ हजार ७६० किमी प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यातून लघुग्रहाच्या दिशेने होणा-या बदलाची नोंद घेतली जाईल. तसेच टकरीमुळे लघुग्रहाची दिशा बदलणार की नाही, हे पाहिले जाईल. तसेच टकरीदरम्यान लघुग्रहाच्या वातावरणातील धातू, धूळ, माती याचा अभ्यास केला जाईल.

या मोहिमेचे नामकरण डब्ल एस्टेरॉयड रीडायरेक्शन टेस्ट असे करण्यात आले आहे. त्यासाठी ज्या तंत्राचा वापर केला जाणार आहे, त्याला कायनेटिक इस्पॅक्टर टेक्निक म्हटले जाते. हे तंत्र यासाठी विकसित केले आहे की, ज्यामुळे पृथ्वीच्या दिशेने येणा-या लघुग्रहांवर स्पेसक्राफ्ट आदळवून त्याच्या दिशेमध्ये बदल केला जाऊ शकेल.

ज्या लघुग्रहावर नासा डार्ट स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून हल्ला करणार आहे, त्याचे नाव डिडीमोस असे आहे. डिडीमोस हा लघुग्रह २६०० फूट व्यासाचा आहे. याच्या बाजूंनी फिरणारा एक छोटा चंद्रासारखा सूक्ष्म ग्रहही आहे, त्याचे नाव डायमॉरफोस आहे. यानाची टक्कर याच लघुग्रहाशी होणार आहे. याचा व्यास ५२५ फूट आहे. नासा या छोट्या चंद्रासारख्या दगडाला लक्ष्य करेल. त्यानंतर दोघांच्या गतीत होणा-या बदलाचे अध्ययन पृथ्वीवर असलेल्या टेलिस्कोपने केले जाईल, असे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या