36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयलतादिदींबाबत खोट्या अफवा पसरवू नका

लतादिदींबाबत खोट्या अफवा पसरवू नका

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या कुटंबियांनी त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत अशी माहिती दिली आहे. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे लाखो चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने अपडेट्स दिले जात आहेत. लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांतर्फे एक निवेदन जारी केले असून डॉक्टरांचे एक पथक त्यांची सतत काळजी घेत आहे, असे म्हटले आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ट्विट करून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका असे म्हटले आहे.

स्मृती इराणी यांनी लता मंगेशकर यांच्या डॉक्टरांच्या निवेदनाची एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, लता दीदींच्या कुटुंबियांच्या वतीने विनंती आहे अफवा पसरवू नका. त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून देवाच्या आशीर्वादाने लवकरच ब-या होऊन घरी परतणार आहेत. अफवा टाळा आणि लता दीदींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत राहा, असे म्हटले आहे.

शुक्रवारी रात्री एक निवेदन जारी करून लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांना लोकांना आवाहन केले की, खोट्या बातम्यांना पसरवू नका. लता दीदी सध्या आयसीयूमध्ये असून डॉ. प्रतित समदानी त्यांच्या डॉक्टरांच्या टीमसह त्यांच्यावर उपचार करत आहेत. लता दीदींच्या कुटुंबाला आणि डॉक्टरांनाही वेळ देण्याची गरज आहे. लता मंगेशकर यांचे कुटुंबीय सतत खोट्या बातम्या पसरवू नका असे आवाहन करत आहेत. गेल्या आठवड्यातही, लता मंगेशकर यांची तब्येत खालावली असताना, त्यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले होते की, खोट्या बातम्या प्रसारित होताना पाहून खूप त्रास होत आहे. त्यांच्यावर पात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या