मोदीने केले रोमँटिक फोटो शेअर
नवी दिल्ली : अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे पहिले फाऊंडर ललित मोदी यांच्या प्रेमाचा अध्याय सुरू झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबत काही फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यात प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. तसेच त्यांनी खास पोस्ट लिहिली असून, यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ललित मोदी यांनी सोशल मीडियावर अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोत त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाप असा केला आहे. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोच्या आधारावर दोघांचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात आहे. सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे. ललित मोदी यांनी पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा बेटरहाफ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुस-या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करू, असे म्हटले आहे. सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते. ललित मोदी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली आहे.
ललित मोदी यांनी याआधी आईची मैत्रिण मीनलसोबत लग्न केले होते. मीनल ललित मोदींपेक्षा ९ वर्षांनी मोठ्या होत्या. मीनल यांचे लग्न नायजेरियाचे उद्योगपती जॅक सागरानी यांच्यासोबत होणार होते. त्यापूर्वीच ललित मोदी यांनी प्रपोज केले. मात्र, मीनल आणि सागरानी यांचा संसार जास्त काळ चालला नाही. मीनलने घटस्फोट घेतल्यानंतर ललित मोदी यांच्याशी जवळीक वाढली.