27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रलाड विरुद्ध भाई जगताप यांच्यात काट्याची टक्कर

लाड विरुद्ध भाई जगताप यांच्यात काट्याची टक्कर

एकमत ऑनलाईन

मुंबई : सोमवारी होणा-या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यात भाई जगतापांची जागा तुलनेने डेंजर झोनमध्ये मानली जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत काँग्रेसच्या भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्याने मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांची जागा काँग्रेसकरिता प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाई जगताप दुस-या क्रमांकाचे उमेदवार असल्याने त्यांची मदार प्रेफरन्शीअल वोटिंग आणि अपक्षांवर असणार आहे.

शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला तर काँग्रेसची दुसरी जागा सेफ होईल. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसोबत काँग्रेस शिष्टमंडळासोबत बैठकांचे सत्र रंगले.

अपक्ष, लहान पक्षांचे
गणित कसे जुळवणार?
समाजवादी पक्षच्या आमदारांसोबत काँग्रेसच्या आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. मात्र, सपा आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसपैकी कोणाला मतदान करायचे, याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत घेतील. काँग्रेसकडून भाई जगतापांनी बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकुरांची भेट घेतली आहे. बविआ कोणाला मतदान करेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच बच्चू कडूंनी मविआला समर्थन दिले आहे. कोणाला मतदान करणार हे ठरणे बाकी असल्याचे समजते. याशिवाय शेकाप, मकाप स्वाभिमानी, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचेही महाविकास आघाडीला समर्थन आहे.

शिवसेना समर्थक अपक्षांची
मते कॉंग्रेसला देण्याची मागणी
शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आणि काँग्रेस नेत्यांसोबत बैठक रात्री अकरा वाजता झाली. या बैठकीत शिवसेनेकडे असलेली अपक्षांची मते काँग्रेसला देण्याची विनंती काँग्रेस नेत्यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री निर्णय देतील. रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी यावर मुख्यमंत्री निर्णय देण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या