लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज १३ नवे रुग्ण सापडले, तर १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४३५ एवढा झाला आहे. आज ५६४ जणांची आरटीपीसीआर, तर १०५७ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली.
त्यात आरटीपीसीआरमधील १०, तर रॅपिड अँटिजन टेस्टमधील ३ असे एकूण १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९२ हजार ४०० झाली असून, त्यापैकी ८९ हजार ९२० रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.