लातूर : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना मंगळवार दि. २५ जानेवारी रोजी उत्कृष्ट कार्यसेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांना तब्बल २८ वर्षे उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक हा पोलिस विभागातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. या प्रसंगी पोलिस अधीक्षक निखील पिंगळे लातूर, अपर पोलिस अधीक्षक अनुराग जैन लातूर, स.पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख लातूर आणि पोलिस अमलंदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
भातलवंडे यांनी सन १९९३ साली पोलिस विभागात पोलिस उप निरीक्षक या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी भंडारा, गोंदीया, नांदेड, बीड, परभणी, लातूर, पोलिस प्रशिक्षण विद्यालय बाभळगांव लातूर येथे सेवा बजावली असून, यापूर्वी सन २००४ मध्ये पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पुरस्कार मिळाला आहे. सन १९९७ मध्ये विशेष सेवा पदक मिळाले आहे. सन २००९ मध्ये अंतरिक सुरक्षा पदक अशी एकूण तीन पदके यापूर्वी मिळालेले आहेत. त्यांना २८ वर्षाचे पोलिस विभागातील सेवेत अनेक संवेदनशिल गुन्ह्याची उकल, तपास, दोषसिद्धी झालेली आहे. उल्लेखनीय कामगिरी बद्दल आतापर्यंत ५३ प्रशंसापत्र, ४१७ बक्षीसे मिळालेली आहेत.