23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयलॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार

लॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार

एकमत ऑनलाईन

जालन्यात प्रकल्प, भारतमाला प्रकल्पाअंतर्गत पार्क, मराठवाडा, विदर्भासाठी सुविधा

नवी दिल्ली : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. यामुळे विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता केंद्रातल्या मोदी सरकारकडून मराठवाडा आणि विदर्भाला मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. भारत माला प्रकल्पाअंतर्गत लॉजिस्टिक पार्क तयार करण्यासंदर्भातला करार आज करण्यात आला. या लॉजिस्टिक पार्कमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे.

जालन्यात हा लॉजिस्टिक पार्क तयार होत आहे. या लॉजिस्टिक पार्कमुळे इतर भागातील उद्योगासोबत संबंध तयार होतील, तसेच मुंबईला जाऊन कराव्या लागणा-या कागदपत्रांच्या पूर्तता आता जालन्यातच पूर्ण होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. जालन्यातील लॉजिस्टिकचा हा प्रकल्प ४५० कोटींचा आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत जालना येथील मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्कसाठी एनएचएलएमएल आणि जेएनपीए यांच्यात आज करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.

भारत माला प्रोजेक्टच्या अंतर्गत भारतात ३५ ठिकाणी मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येणार आहेत. या प्रोजेक्टमध्ये जालन्याचाही समावेश करण्यात आला आहे. जालन्यातल्या या पार्कमुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगाच्या मालाची वाहतूक जलद गतीने आणि कमी पैशांमध्ये होणार आहे.

औद्योगिक विकासाला
चालना मिळणार
या प्रकल्पामुळे जालना आणि औरंगाबाद यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हे, तसेच बुलढाणा भागातील व्यापार उद्योगमालाची वाहतूक वेगवान आणि कमी खर्चात होईल. औद्योगिक वसाहतीतील सर्व परिसर जोडण्यासाठी जालना महत्त्वपूर्ण केंद्र निर्माण होत असून यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

रेल्वेमार्ग, रस्ते, गोदामे,
शीतगृहांची व्यवस्था
रस्ते, रेल्वे मार्ग, दळणवळण, गोदामे, उद्योगातील कच्चा, पक्का माल साठा करून ठेवण्यासाठी मोठी गोदामे, शीतगृहे, कस्टम क्लिअरन्सची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून या संदर्भात आजचा हा सामंजस्य करार राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या