22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रलोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती आवश्यक : फडणवीस

लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती आवश्यक : फडणवीस

एकमत ऑनलाईन

समान नागरी कायदा लागू करण्याचीही गरज
मुंबई : देशातील आणि राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सक्ती करावी लागेल, तसेच एक देश, एक समाज, एक कायदा अशी संकल्पना असलेला समान नागरी कायदा लागू करावा लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

एका वृत्तसमुहाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. अभिनेते नाना पाटेकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये नाना पाटेकरांनी या दोघांना विविध प्रश्नावर बोलते केले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर हे वक्तव्य केले.

कुटुंब नियोजन कार्यक्रमावर आपण कधीच बोलणार नाही का, लोकसंख्या नियंत्रणात असेल तर आपल्याला फायदा होणार नाही का, यावर काय धोरण आहे असे नाना पाटेकर यांनी विचारले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील आणि राज्यातील लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल. त्यासाठी कायद्याची गरज आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी एखादा कायदा आणावा लागेल. चीनच्या धरतीवर आपण काही सक्ती करु शकत नाही. पण भारतातही भारतीय पद्धतीने अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल.

समान नागरी कायद्याची गरज
लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समान नागरी कायदा हा भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. ती प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे. असा कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंडमध्ये येणार आहे. हळूहळू देशाच्या इतर भागातही तो कायदा लागू होईल. पण समान नागरी कायद्याच्या बाबतीत अफवा जास्त आहेत. त्यामुळे कुणाचे तरी आरक्षण जाईल, कुणावर तरी नियंत्रण येतील, अशा प्रकारचा गैरसमज पसरवला जात आहे. पण असे काहीही होणार नाही. एक देश, एक समाज, एक कायदा अशा प्रकारचा हा समान नागरी कायदा आहे. त्यामुळे तो गरजेचा आहे, असे त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या