24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमुनगंटीवारांच्या आदेशास रझा अकादमीचा विरोध

मुनगंटीवारांच्या आदेशास रझा अकादमीचा विरोध

एकमत ऑनलाईन

‘वंदे मातरम’वरुन नव्या वादाला सुरुवात

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्­सवी वर्षाचे औचित्­य साधत यापुढे महाराष्­ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्­ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्­हणता वंदे मातरम् म्­हणत संभाषणाला सुरुवात करतील,’’ अशी घोषणा राज्­याचे नवे सांस्­कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

मात्र, मुनगंटीवारांच्या या घोषणेनंतर वाद निर्माण होत आहेत. रझा अकादमीने या घोषणेला विरोध केला आहे. वंदे मातरम् ऐवजी दुसरा शब्द द्यावा, अशी मागणी अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी केली आहे. आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. वंदे मातरम ऐवजी दुसरा पर्याय द्यावा. असा पर्याय द्यावा की, जो सर्वांना मान्य असेल. याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करुन राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे रझा नूरी म्हणाले.

हॅलो ऐवजी वंदे मारतम् म्हणण्याचा मुनगंटीवारांचा आदेश
मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्­कृतिक खात्­याची जबाबदारी येताच स्­वातंर्त्यदिनाच्­या पूर्वसंध्­येला सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्­या या रचनेतील एकेक शब्­द उच्­चारताच देशभक्­तीची भावना जागृत होते. भारतीय स्­वातंत्र्याच्­या अमृत महोत्­सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्­द त्­यागत त्­याऐवजी शासकीय कार्यालयांमध्­ये यापुढे वंदे मातरम् म्­हणत संभाषण सुरू करण्याचा आदेश मुनगंटीवारांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या