25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयवकिलांशी चर्चा करेल, पण ही पद्धत अयोग्य : सरन्यायाधिश चंद्रचूड

वकिलांशी चर्चा करेल, पण ही पद्धत अयोग्य : सरन्यायाधिश चंद्रचूड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॉलेजियमद्वारे राष्ट्रीय दृष्टीकोन लक्षात घेऊनच न्यायायीन नेमणुकांचे प्रशासकीय निर्णय घेतले जातात. मात्र न्यायाधिशांच्या बदलीवरून असाच विरोध झाला तर न्याय मागणारे पिडीत होतील, असे विधान सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

गुजरात न्यायाधिशांच्या बदलीबाबत उच्च न्यायालयाच्या वकिलांना भेटण्यासही त्यांनी सहमती दर्शवली.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना त्यांनी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या समक्ष वकिलांच्या संपावर नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय कायदामंत्री रिजिजू यांनी बदली प्रकरणी सरन्यायाधिशांनी वकिलांची भेट घेण्याचा आग्रह धरणा-या वकिलांवर टीका केली होती.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायिक पदावर बढती मिळालेले न्या. चंद्रचूड यांनी १६ नोव्हेंबर ला कॉलेजियमची पहिली बैठक घेतली. तीत त्यांनी मद्रास, गुजरात आणि तेलंगणा या उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांपैकी एकाची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्याचा निर्णय घेतला.

पाच सदस्यीय कॉलेजियमने मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश टी. राजा यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदलीची शिफारस केली आहे. तर न्या. निखिल एस करियाल आणि ए अभिषेक रेड्डी यांची पाटणा उच्च न्यायालयात बदलीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

न्या. करियाल यांच्या बदलीला वकील विरोध करत असून ते संपावर गेले आहेत. त्यानंतर सीजेआयने हस्तांतरण प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गुजरात बारच्या शिष्टमंडळाला भेटण्याचे मान्य केले. गुजरात उच्च न्यायालयाचे न्या. करियाल यांच्या प्रस्तावित बदलीबाबत गुजरात बारचे प्रतिनिधी सोमवारी सीजेआयला भेटतील अशी अपेक्षा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या