22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

सातारा : साता-याचे खा. उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या विषयी ‘अफजलाच्या औलादी, मी असल्या गादींच्या छत्रपतींना मानत नाही, असे बोलून ऐन मराठा आरक्षणाच्या काळात खळबळ उडवून देणा-या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुरुवारी साता-यात आणले. त्यांच्यावर आता अटकेची कारवाई सुरू असून उद्या त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, साता-यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

सदावर्ते यांच्याविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात २०२० साली तक्रारदार राजेंद्र निकम रा. तारळे ता. पाटण यांनी तक्रार दिलेली आहे. एका टीव्ही चॅनेलवर सदावर्ते यांनी दोन्ही राजेंविषयी बेताल वक्तव्य केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन पोलिस तपासी अधिकारी नेमण्यात आले आहेत. सध्या पोनि वंदना श्रीसुंदर या तपासी अधिकारी आहेत. गुरुवारी आर्थर जेलमधून सदावर्ते यांचा पोलिसांनी ताबा घेतला. ट्रान्झिट रिमांडवर साता-यात आणल्यानंतर आता त्यांना अटक केली जाईल. यावेळी अटक पंचनामा करून संशयित आरोपी सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना सिव्हिलमध्ये नेले जाईल. यानंतर कायद्याप्रमाणे अटक केल्यानंतर संशयिताला २४ तासांत कोर्टात हजर केले जाते. दरम्यान, त्यांना उद्या ११ वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपास अधिकारी भगवान ंिनबाळकर यांनी माहिती दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या