24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयवाराणसीत पिता-पुत्रांसह ४ जणांचा जळून मृत्यू

वाराणसीत पिता-पुत्रांसह ४ जणांचा जळून मृत्यू

एकमत ऑनलाईन

वाराणसी : वाराणसीमध्ये गुरुवारी साडीच्या दुकानाला लागलेल्या आगीत चार जण ठार झाले. मृतांमध्ये पिता आणि मुलाचा समावेश आहे. दोघेही बिहारमधील अररिया येथील रहिवासी होते. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे.

भेलुपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामछा येथील अशफाकनगरमध्ये दाट लोकवस्तीच्या मधोमध असलेल्या घराच्या खोलीत शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली. बंद खोलीत चौघांचाही भाजून मृत्यू झाला. वडील आरिफ अहमद आणि मुलगा मोहम्मद शबान हे साड्यांच्या पॅकेंिजगचे काम करायचे. येथे ते भाड्याने खोली घेऊन काम करायचे. गुरुवारी दुपारीही ते साडीचे पॅकिंग करीत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या