26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रविदर्भात ८ जिल्ह्यांना पुराचा तडाखा

विदर्भात ८ जिल्ह्यांना पुराचा तडाखा

एकमत ऑनलाईन

सरासरीच्या १८० टक्के पावसाची नोंद
नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेले पावसाचे थैमान आजही कायम आहे. विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा १८० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांत पूरस्थिती कायम आहे. आज अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे अमरावतीच्या ३० तर तर वर्ध्याच्या ४२ गावांचा संपर्क तुटला. मदत आणि बचावकार्यासाठी वर्ध्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सगळ््यांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस आज वर्धा आणि चंद्रपूरच्या दौ-यावर आहेत. पूरग्रस्त भागांची ते पाहणी करणार असून त्यानंतर नागपुरात या संपूर्ण स्थितीची आढावा बैठक होणार आहे.

अकोल्यातही पूरस्थिती कायम आहे. पूर्णा नदीला पूर आल्याने गांधीग्राम पुलावर १० ते १२ फूट पाणी आले आहे. या पुलावरून पाणी जात असल्याने अकोट-अकोला मार्ग १८ तासांपासून बंद आहे. अकोट-शेगाव-अंदुरा मार्गही बंद झाला आहे. अकोला शहरातील शेकडो घरांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक भागातील शेतीही पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. पूर्णा मध्यम प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या