29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध

विधान परिषदेचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती, त्यामुळे सकाळपासूनच जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत होत्या. अखेर तीन वाजपेर्यंत राजकीय तडजोडींमधून राज्यातील ६ पैकी ४ जागा बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार अर्ज मागे घेण्यात आले. मात्र, दोन जागांचा तिढा न सुटल्याने या ठिकाणी निवडणूक होत आहे.

राज्यातील सहापैकी बिनविरोध झालेल्या चार जागांमध्ये मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा येथील जागेवर लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस, तर अकोला-वाशिम-बुलडाणा येथे शिवसेना विरुद्ध भाजपा लढत होत आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा उमेदवार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. धुळ््यात भाजपाचे अमरिश पटेल हे बिनविरोध निवडून आले.

याशिवाय मुंबईमधील बिनविरोध झालेल्या दोन जागांवर भाजपचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांची वर्णी लागली आहे, तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर हे आमने-सामाने आहेत. याचबरोबर अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात भाजपाकडून वसंत खंडेलवाल आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजेरिया हे निवडणूक रिंगणात आहेत. आमदार गोपीकिशन बाजेरिया हे आतापर्यंत तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या