22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांवरून राजकारण तापलेले असतानाच विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. २० जूनला मतदान होणार असून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याआधी विधानपरिषदेचे गणित कसे असेल, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे.
भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे या आमदारांची मुदत संपत आहे, तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांचे निधन झाल्याने जागा रिक्त झाली आहे.

शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड यांची मुदत संपत आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष यांचे संख्याबळ ११३ इतके होत असल्याने भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात.

दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील, तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. त्यानंतरही त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मते शिल्लक राहत असून दुस-या उमेदवारासाठी त्यांना १२ मतांची तजवीज करावी लागणार आहे.

भाजपकडून कोण-कोण?
भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या दोघांची उमेदवारी निश्चित मानली जाते, तर विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांचा पत्ता कट होऊ शकतो. त्याऐवजी पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना संधी मिळू शकते.

शिवसेना : मंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा संधी मिळू शकते. मात्र दिवाकर रावतेंना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे.

राष्ट्रवादी : राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकरांचे तिकीट कन्फर्म मानले जाते, तर दुसरी जागा कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या