29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रविनोद तावडे यांनी घेतली मोदींची भेट

विनोद तावडे यांनी घेतली मोदींची भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मागच्या विधानसभा निवडणुकीपासून प्रवाहाबाहेर पडलेल्या माजी मंत्री विनोद तावडे यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने त्यांची नुकतीच राष्ट्रीय चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे तावडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. या निवडीनंतर आपण कार्यकर्ता म्हणून पुन्हा कामाला लागणार आहोत, असे म्हटले. त्यानंतर आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

मागच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब-याच नेत्यांना तिकीट नाकारत निवडणुकीपासून दूर ठेवले होते. त्यामुळे तावडे यांच्यासह काही नेते नाराज होते. त्यातच तावडे यांनी सक्रीय राजकारणापासून दूर राहणे पसंत केले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या