26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाविराटमधील ऊर्जा संपल्यासारखी वाटतेय : शेन वॉटसन

विराटमधील ऊर्जा संपल्यासारखी वाटतेय : शेन वॉटसन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ‘रनमशिन’ विराट कोहली याच्या बॅटमधील धावा आटल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमध्येही तो मोठी खेळी करण्यात सतत अपयशी ठरत आहे. विराट कोहली सध्या कठीण काळातून जात असून यावर आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहप्रशिक्षक शेन वॉटसन याने आपले मत व्यक्त केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स बंगळुरूविरुद्ध खेळताना त्या सामन्यात जुना विराट दिसला नाही. त्याच्यामध्ये खूप बदल झाल्यासारखे वाटत आहे. मी विराटला यापूर्वीही खेळताना पाहिले आहे. त्याच्यासोबत बंगळुरूसाठी काही वर्षे खेळलोही आहे. परंतु आता त्याच्यात खेळाडू म्हणून बदल झाला असून विराटची ऊर्जा कमी झाली आहे, असे शेन वॉटसन म्हणाला. विराट कोहली फलंदाजीला येतो तेव्हा खूप उत्साही असतो. मैदानात त्याची ऊर्जा दिसते. त्याची आक्रमकताही खेळातून दिसून येते. परंतु आता त्याच्यात बदल झाल्याचे दिसत आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यापासून विराटमधील ऊर्जा कमी झालीय. हिंदुस्थानसारख्या क्रिकेटवेड्या देशात एका आक्रमक खेळाडूसाठी कर्णधारपद सोडून सामान्य खेळाडूप्रमाणे क्रिकेट खेळण्यातला बदल किती विचित्र असू शकतो याची आपल्याला कल्पना असल्याचेही वॉटसन म्हणाला.

या बदलातून बाहेर येण्यासाठी विराट कोहली याला काही काळ द्यावा लागेल, असेही वॉटसन म्हणाला. विराट कोहली हा लढाऊवृत्तीचा खेळाडू असून त्यामुळे तो या सगळ्या गोष्टींवर मात करून पुन्हा फलंदाजीच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास वॉटसन याने व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली याला शतक ठोकून दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. निदान आयपीएलमध्ये तो धावांचा रतिब घालून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कमबॅक करेल अशी आशा क्रीडाप्रेमींना होती. मात्र आतापर्यंत विराट कोहलीच्या बॅटला गंज लागल्याचेच दिसत असून त्याने ८ लढतीत फक्त ११९ धावा केल्या आहेत. सलग दोन लढतींमध्ये तर तो गोल्डन डकवर बाद झाला आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या