27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमनोरंजनविरुष्काने मानले माध्यमांचे आभार

विरुष्काने मानले माध्यमांचे आभार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत आहे. अलीकडेच, अनुष्का मुलगी वामिका आणि विराटसोबत दक्षिण आफ्रिकेला जात असताना विमानतळावर दिसून आली. यादरम्यान तिला आपली मुलगी वामिकाचा चेहरा माध्यमांपासून लपवता आला नाही. त्यामुळे विमानतळावर उपस्थित पापराझी आणि माध्यमांनी वामिकाचे काही फोटो कॅमे-यात कैद केले. मात्र, यावेळी विराट आणि अनुष्का दोघेही माध्यमांना वामिकाचा फोटो न काढण्याची विनंती करताना दिसले.

या घटनेनंतर अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सर्व पापराझी आणि माध्यमांचे आभार मानले आहेत. अनुष्काने हा संदेश तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत आभार मानले आहेत. पोस्टमध्ये अनुष्काने लिहिले, ‘‘वामिकाचे फोटो, व्हीडीओ शेअर न केल्याबद्दल भारतीय पापराझी आणि माध्यमांचे खूप आभारी आहोत. ज्यांनी वामिकाचे फोटो आणि व्हीडीओ काढले आहेत, त्यांना आम्ही पालक या नात्याने विनंती करतो, की त्यांनी तिला पुढे जाण्यास मदत करावी.’ ही पोस्ट तिने आणि विराटने लिहिली असल्याचेही अनुष्काने सांगितले.

‘आम्हाला आमच्या मुलीची गोपनीयता हवी आहे आणि तिला मीडिया, सोशल मीडियापासून दूर ठेवून स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याची संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. ती मोठी झाल्यावर आम्ही तिला अडवू शकत नाही. या परिस्थितीत आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे’, असेही अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या