22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयसीरमच्या बुस्टर डोसला परवानगी द्या

सीरमच्या बुस्टर डोसला परवानगी द्या

एकमत ऑनलाईन

डीसीजीआयकडे केली मागणी
पुणे : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने भारतात बूस्टर डोस म्हणून कोविशील्ड लसीसाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने देशात लसींचा पुरेसा साठा आणि नवा कोरोना व्हेरिएंट उदयास येण्याची शक्यता आहे. यामुळे बूस्टर डोसच्या मागणीचा हवाला दिला आहे.
देशाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांना दिलेल्या निवेदनात सीरम इन्स्टिट्यूटचे नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंग म्हणाले की, कोविडच्या वैद्यकीय नियामकाने आधीच एस्ट्राजेनेकाच्या कोविड लसीचा बूस्टर डोस मंजूर केला आहे. अशा स्थितीत कंपनीच्या लसीला भारतातही मान्यता मिळायला हवी. यापूर्वी कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी काल सीरम इन्स्टिट्यूट ओमायक्रॉन व्हेरिएंटला सामोरे जाण्यासाठी कोविशील्डचा बूस्टर डोस बनवू शकते, असे म्हटले होते. ओमायक्रॉनचा अभ्यास केला जात आहे. याबाबत अधिक माहिती मिळण्यासाठी अजून २ आठवडे लागतील, असेही ते म्हणाले होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या