25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविरोधकांना कमजोर करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर

विरोधकांना कमजोर करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर

एकमत ऑनलाईन

संजय राऊत यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असून, विरोधकांना कमजोर करण्यासाठी याचा वापर सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सत्य सांगणा-यांचे तोंड बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

पत्राचाळ घोटाळ््याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने काल रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर आज कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. संजय राऊतांच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करत केंद्राकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. राहुल गांधी यांनीदेखील संजय राऊत यांना ईडी कार्यालयाकडे घेऊन जात असल्याचा फोटो ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्याविरुद्ध बोलेल त्याला त्रास होईल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचे मनोधैर्य खचविण्याचे आणि सत्य दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण तानाशाह ऐक, शेवटी सत्याचाच विजय होतो आणि अहंकार हरतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या