पुणे : खोक्यांना हात लावले नाही असे ४० आमदारांमधील कुणी का म्हणाले नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना केला. तर विरोधी बोलणा-य कार्यकर्त्यांवर केंद्रातील यंत्रणेकडून धाड पडत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
राज्यात गलिच्छपणाचे राजकारण सुरू आहे. आमची महाविकास आघाडी ही जनतेसाठी केली आहे, तर त्यांची आघाडी ही केवळ खुर्चीेसाठी असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केला आहे. म्हणून त्यांच्या सभेत खुर्च्यांची गर्दी दिसते असा टोलाही मुख्यमंत्र्यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदे गटातील कुणीच अजूनपर्यत खोके घेतले नाही आसे म्हटले नाही. देशभरात गद्दारांच्या विरोधात संतापाची लाट आहे. महाराष्ट्रात असे वातावरण कधीच पाहिले गेले नाही. पक्ष बदल करण्यासाठी लोकांनी आमदारकी, आणि खासदारकीचा राजीनामा देत विचारसरणी बदलली आहे. मविआच्या सभांना जनतेची गर्दी दिसून येते, तर शिंदे गटाच्या सभेला केवळ रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असल्याचे दिसून येते. सर्व ठिकाणी जनतेचा मविआवर विश्वास आहे म्हणूनच महाराष्ट्रभरात जनता मविआला साथ देते आहे.
जनतेसाठी आम्ही एकत्र आलो
आमच्या विचारसरणी वेगळी असली तरी लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र आलो. आम्हाला सत्तेची हाव नव्हती. मविआची सत्ता ही जनतेची होती. भाजप पुरस्कृत गद्दार सरकारने महाराष्ट्र प्रगती करत असल्याने राज्याची प्रगती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पांिठत ४० वार केले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केले आहे.महिलांचा उद्धव ठाकरेंवर अजित पवार, पटोले, थोरात यांच्यावर मोठा विश्वास असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.