नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचा तरुणांना लाभ घेता यावाह्याणि जगाच्या स्पर्धेत भारतीय तरुण टिकावा यासाठी केंद्र सरकारने कौशल्य विकास केंद्रांच्या चौथ्या टप्प्यावर जोर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. यात केंद्र सरकार विविध राज्यांमध्ये ३० स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्स स्थापन करणार आहे.
पारंपारिक कारागिरांसाठी सहाय्य पॅकेजची संकल्पना अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. ज्यामुळे तरुण एमएसएमई चेनशी एकरूप होऊन त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, प्रमाण आणि पोहोच सुधारण्यास सक्षम होतील.
गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार जगातील दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. आम्ही अनेक शाश्वत विकासांच्या ध्येयांमध्ये मध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. अनेक योजनांच्या कार्यक्षम अंमलबजावणीमुळे सर्वसमावेशक विकास झाला आहे.