18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयवैज्ञानिकांना सापडला पाण्याचे साठे असलेला ग्रह

वैज्ञानिकांना सापडला पाण्याचे साठे असलेला ग्रह

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अंतराळातील संपूर्ण गूढ अद्याप कोणालाच उलगडलेले नाही त्यामुळे शास्त्रज्ञ नेहमीच अंतराळात डोकावण्याचा प्रयत्न करत असतात. आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांना आपल्या सूर्यमालेच्या बाहेर एक ग्रह आढळला असून त्याच्यावर भरपूर पाणी असल्याने या ग्रहावर जीवसृष्टी असल्याची आशाही पल्लवित झाली आहे.
सध्याच्या सूर्यमालेच्या बाहेर एल ५९९८ या ता-याच्या भोवती प्रदक्षिणा घालणारा एक ग्रह शास्त्रज्ञांना आढळला आहे. या ग्रहावर पाण्याचा भरपूर साठा असल्याचे पुरावे मिळाल्याने शास्त्रज्ञांना या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची आशाही वाटू लागली आहे. बीबीसी या माध्यम संस्थेच्या स्काय ट नाईट या नियतकालिकांमध्ये या बाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये आपल्या सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या इतर ता-यांभोवती फिरणा-या काही ग्रहांचा शोध घेण्याची मोहीम आखण्यात आली होती. त्यामध्ये तीन ग्रहांचा शोध लागला होता त्यापैकी हा एक ग्रह असून त्यावर हे पाण्याचे साठे आढळले आहेत.

या ग्रहाचे आकारमान खूप छोटे असून सूर्यमालेतील शुक्रा पेक्षा तो आकाराने निम्मा आहे. ज्या ता-याभोवती हा ग्रह फिरत आहे तो ग्रह पृथ्वीपासून ३५ प्रकाशवर्ष दूर आहे. शास्त्रज्ञांनी नुकतेच या ग्रहाची माहिती प्रसिद्ध केली असून आगामी काळात आणखीन मोठ्या प्रमाणावर संशोधन करून या ग्रहा बाबत आणखी काही महत्त्वाची माहिती मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या