26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयवैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड नाही

वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड नाही

एकमत ऑनलाईन

समुपदेशन प्रक्रिया राबविण्याची मागणी फेटाळली
नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील नीटच्या उर्वरीत १४५६ रिक्त जागा भरण्यासाठी विशेष समुपदेशन प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करणा-या याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरविल्या. वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेशी अशा प्रकारे तडजोड केली जाऊ शकत नाही व त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवांवर प्रभाव पडेल, असे याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. एम. आर. शहा व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने हा निकाल दिला.

जेव्हा २०२१ साठी प्रवेश प्रक्रियेची नीट परीक्षा पार पडली आहे, अशा वेळी समुपदेशनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिलासा म्हणूनही आम्ही देऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.
अशा प्रकारे विशेष समुपदेशन प्रक्रियेची सुविधा देण्यास केंद्र सरकार व वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) नकार देताना त्याबाबतचा निर्णय रद्द केला होता. न्यायालयाने आज तो निर्णय योग्य ठरविला. हा निर्णय सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण या मुद्यांच्या दृष्टीने उचित असल्याचे सांगतानाच, जर केंद्र सरकार व एमसीसीने काही विचार करून हा निर्णय घेतला असेल तर तो मनमानी म्हणता येणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

महासंचालनालयानेही
दिले होते स्पष्टीकरण
देशाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने बुधवारीच न्यायालयाला कळविले होते की नीट-पीजी २०२१ परीक्षेसाठी अखिल भारतीय कोट्यासाठीच्या समुपदेशनाचे चार टप्पे पार पडले आहेत. यासाठीचे सॉप्टवेअरही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे १४५६ उर्वरीत जागांसाठी वेगळी समुपदेशन प्रक्रिया पुन्हा सुरू करणे आता यंत्रणेला शक्य नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या