19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयव्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आजचा दिवस एप्रिल फुल म्हणून ओळखला जात असला तरी ही बातमी काही तुम्हाला फूल करण्यासाठी नसून वास्तव आहे. आज पुन्हा एकदा महागाई वाढली असून, सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले आहेत. १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. नवी दिल्लीमध्ये आता कमर्शियल सिलिंडर २,२५३ रुपयांचा झाला आहे.

कमर्शियल सिलिंडरच्या दरामध्ये २५० रुपयांची भाववाढ आली आहे. या भाववाढीनंतर आता कोलकातामध्ये हा सिलिंडर २,३५१ रुपयांचा झाला आहे. मुंबईमध्ये २,२०५ रुपयांचा तर चेन्नईमध्ये २,४०६ रुपयांचा झाला आहे. याआधी सरकारने एक मार्च रोजीच १०५ रुपयांची घसघशीत भाववाढ केली होती. तर गेल्या २२ मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवले होते, तेंव्हा याचे दर ९ रुपयांनी स्वस्त केले होते. इंधन कंपन्यांनी एक एप्रिलला घरगुती सिलिंडरच्या दरात भलेही वाढ केली नसेल मात्र, अगदी दहा दिवसांपूर्वीच म्हणजेच २२ मार्च रोजी सरकारने सामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवून टाकले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी केले एप्रिल फुल
गेल्या १० दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे आजही वाढ होणार असे वाटत असतानाच त्या दरांनी आपल्याला एप्रिल फुल केले आहे. आज या दरांमध्ये वाढ आज झालेली नाही. मुंबईत आज कालच्या एवढेच पेट्रोल, डिझेलचे दर आहेत. पेट्रोल प्रति लीटर ११६.७२ रुपये आणि डिझेल प्रति लीटर १००.९४ रुपये एवढे आहे. तर पुण्यात पेट्रोल ११६.३८ प्रती लीटर आणि डिझेल ९९.१२ रुपये प्रती लीटर आहे. पुण्यामध्ये १२ पैशांनी डिझेलच्या दरात घसरण झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या