27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रशक्य त्या मार्गाने डेटा गोळा करणे सुरू

शक्य त्या मार्गाने डेटा गोळा करणे सुरू

- १७ जानेवारीला सुनावणीची शक्यता - अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती

एकमत ऑनलाईन

नाशिक : ज्या-ज्या मार्गाने इंपेरिकल डाटा गोळा होईल त्या मार्गाने तो गोळा करण्याचे काम सुरु असून, आपण जो अध्यादेश काढला त्याचा बेस काय आहे, हे न्यायालय पटवून देत आहोत अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच याबाबत १७ जानेवारीला कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे देखील भुजबळ म्हणाले.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) विशेष न्यायालयाने या प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याविषयी बोलताना कुणी कोर्टात गेले, तरी त्याची चिंता करण्याचे कारण नाही, अ‍ॅक्टिविस्ट आहेत, कुणीही कोर्टात जाऊ शकते, त्यावर अधिक भाष्य करणार नाही, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या