22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयशबाना, नसरुद्दीन आणि जावेद अख्तर टुकडे टुकडे गँगचे सदस्य

शबाना, नसरुद्दीन आणि जावेद अख्तर टुकडे टुकडे गँगचे सदस्य

एकमत ऑनलाईन

मध्य प्रदेशच्या गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: मध्य प्रदेश सरकारमधील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी नुकतेच एक धक्कादायक विधान केलं आहे. शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यावर मिश्रा यांच्याकडून या कलाकारांवर टुकडे-टुकडे गँगच्या स्लीपर सेलचे सदस्य असल्याची टीका करण्यात आली आहे.

राजस्थानमधील उदयपूरमध्ये झालेल्या डझनभर हत्या आणि झारखंडमध्ये एका महिलेला पेटवून देण्यात आल्यानंतरही या घटनांविषयी या सेलिब्रेटींनी का आवाज उठवला नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनांबद्दल त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले नसल्याने त्यांची नीच पातळीवरची मानसिकता दिसून येते असंही त्यांनी म्हटले.

अभिनेत्री शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा आणि जावेद अख्तर यांच्याविषयी टिपणी करताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, झारखंडमध्ये आमच्या मुलीला पेटवून देण्यात आले, त्यावेळी मात्र या सेलिब्रिंिटनी अवाक्षरेही काढले नाही, त्यावेळी त्यांनी मौन धारण केले होते.

भाजपशासित राज्यात अशा काही घटना घडल्या तर अभिनेता नसीरुद्दीन शहाला देशात राहण्याची भीती वाटते. मग ते घाबरून आपला एक पुरस्कार ते परत करतात, आणि अशा घटना भाजपप्रणीत राज्यात घडल्या तर हेच लोके ओरडून सांगायला पुढे असतात असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

यांना धर्मनिरपेक्ष का म्हणतात?
या अशा घटना घडल्यावरही सेलिब्रेटींकडून कोणत्याही भावना व्यक्त केल्या जात नाहीत, त्यावेळी त्यांची नीच मानसिकता प्रकर्षाने दिसून येते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे त्यांना सभ्य आणि धर्मनिरपेक्ष का म्हटले जाते यावर विचार होणं गरजेचे आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

कन्हैया लाल यांच्या हत्येविषयी मौन
या घटनांविषया बोलताना नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शहांसारखी लोकं ही टुकड़े टुकड़े गँगच्या स्लीपर सेलचे सदस्य असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैया लाल यांच्या हत्येविषयी बोलताना या घटनांविषयी त्यांनी कोणतेही विधान केले नसल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या