26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रशशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी?

शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी?

एकमत ऑनलाईन

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालात दिग्गजांनाच धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे आणि गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई या दोन दिग्गजांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जातो. यातही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांचा झालेला पराभव पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली बंडाळी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साता-यात जाऊन त्यांची भेट घेतली.

शिंदे यांच्या पराभवासंदर्भात पवार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये साता-यामधील सर्किट हाऊसमध्ये चर्चा झाली. या चर्चेला विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राष्ट्रवादी सोडण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

साहेब नेहमीच माझी समजूत काढतात : शिंदे
शशिकांत शिंदे सर्किट हाऊसमधून बाहेर येत असताना पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि ‘पवार यांच्याशी काय बोलणे झाले?’, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शशिकांत शिंदेंनी, ‘मला तुम्हाला स्पष्ट सांगायचे आहे कोणतीही चर्चा झालेली नाही. मला जे बोलायचं आहे ते मी २५ तारखेला पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहे,’ असे म्हटले. नंतर पवार यांनी तुमची समजूत काढली का?,’ असा प्रश्न विचारला असता, ‘पवार साहेब नेहमीच माझी समजूत काढतात. पवार साहेब आहेत म्हणून मी आहे.’ असे शिंदे यांनी उत्तर दिले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या