36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमनोरंजनशाहरुख-काजोल एकत्र येणार

शाहरुख-काजोल एकत्र येणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत असंख्य सिनेमांची निर्मिती होत आहे. त्यामुळे येत्या काळात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळेल. या आगामी सिनेमांची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. त्याहीपेक्षा कोणती कलाकार जोडी पाहायला मिळेल, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता प्रसिद्ध जोडी शाहरुख खान आणि काजोल पुन्हा एकत्रित येणार आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणजे शाहरुख खान आणि कोजोल. दिलवाले दुल्हनियासह अनेक चित्रपटातून चाहत्यांच्या पसंतीला उतरलेली ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्यामुळे या जोडीला पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात बॉलिवूडची सुपरहिट जोडी काजोल आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचे समजते.

या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यात काजोल आणि शाहरुख फक्त एका गाण्यात एकत्र दिसतील की त्यांच्या खास भूमिका असतील, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत, तर रोहित शेट्टीच्या दिलवाले या सिनेमात काजोल आणि शाहरुख एकत्र येत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या