26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयशिक्षेविरोधात अपिलाचा कुलभूषण यांना अधिकार

शिक्षेविरोधात अपिलाचा कुलभूषण यांना अधिकार

एकमत ऑनलाईन

पाकची माघार, संसदेत पास केले विधेयक
इस्लामाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तातील तुरुंगात असलेले भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची आशा निर्माण झाली आहे. कारण भारताने केलेल्या धोरणात्मक प्रयत्नांमुळे आणि आंतरराष्ट्रीय न्याय लवादाने दिलेल्या निकालानंतर अखेर पाकिस्तानला नमते घेत माघार घ्यावी लागली. त्यातूनच कुलभूषण जाधव यांच्यासाठी पाकिस्तानने थेट त्यांच्या संसदेत विधेयक पारित केले. यामुळे जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
२०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, भारताने कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. या पार्श्वभूमीवर कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये पाकिस्तान सरकारला कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश दिले. तसेच भारताला त्यांचा कौन्सेलर अ‍ॅक्सेस द्यावा, असेदेखील न्यायालयाने निर्देश दिले होते.
गेल्या वर्षी २०२० मध्ये पाकिस्तानमधील सत्ताधारी इम्रान खान सरकारने तिथल्या संसदेमध्ये कुलभूष जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अध्यादेशदेखील काढण्याची तयारी दर्शवली. संसदेत विरोधकांनी याला विरोध केल्यानंतरही अध्यादेश पारित करण्यात आला. त्यानंतर या वर्षी १० जून रोजी कुलभूषण जाधव यांना दाद मागण्याचा अधिकार देणारे विधेयक संसदेत मांडण्यात आले. या विधेयाला आता मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना आता शिक्षेविरोधात अपिल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या