24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना सहयोगीपक्षांची १५ मते फुटली

शिवसेना सहयोगीपक्षांची १५ मते फुटली

एकमत ऑनलाईन

फाटाफुटीचे गणित, भाजपला २७ मते अतिरिक्त मिळाली
मुंबई : भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील मते फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेची ३ तर सहयोगी अपक्षांची एकूण १२ मते फुटली. काँग्रेसची २ मते फुटल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत पाचव्या उमेदवारांसाठी एकही मत नसताना भाजपला अतिरिक्त २७ मते मिळाली.

भाजपला चार उमेदवार निवडून येण्याची शाश्वती असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीमुळे पाचही उमेदवार निवडून आले. शिवसेना पक्षाची तीन मते फुटली, तर सहयोगी पक्षाची एकूण १२ मते फुटली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला १२३ मते मिळाली होती, आता या निवडणुकीत त्यांना १३३ मते मिळाली. त्यामुळे भाजपला अतिरिक्त २७ मते मिळाली आणि त्यांचा पाचवा उमेदवार निवडून आला.

काँग्रेसची २ मते फुटल्याने चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसची पहिल्या पसंतीची मते हंडोरे यांना द्यायचे ठरले असतानाही त्यांना पहिल्या फेरीत विजयी होता आले नाही. पहिल्या फेरीत त्यांना २२ मते मिळाली तर भाई जगताप यांना २० मते मिळाली.

कुणाची किती मते फुटली?

एकूण मते-२८५

महाविकास आघाडीला
मिळालेली मते : १५१
(शिवसेना : ५२, राष्ट्रवादी : ५७, काँग्रेस : ४२)

भाजप : १३३
——
एकूण : २८५
——-

शिवसेनेची ३ मते फुटली
शिवसेना संख्याबळ (अपक्ष वगळून) : ५५
सचिन अहिर : २६
आमश्या पाडवी : २६
एकूण : ५२ म्हणजेच शिवसेनेची ३ मते फुटली
—————–
कॉंग्रेसची २ मते फुटली
काँग्रेस संख्याबळ : ४४
भाई जगताप : २०
चंद्रकांत हंडोरे : २२
एकूण : ४२
म्हणजे काँग्रेसची २ मते फुटली
—————–
राष्ट्रवादीला ज्यादा मते
संख्याबळ : ५१
एकनाथ खडसे : २९
रामराजे : २८
एकूण : ५७
६ मते ज्यादा मिळाली
—-
भाजपला २७ मते
अतिरिक्त मिळाली
भाजप संख्याबळ : १०६
श्रीकांत भारतीय : ३०
राम शिंदे : ३०
प्रवीण दरेकर : २९
उमा खापरे : २७
प्रसाद लाड : १७
एकूण : १३३
भाजपला पहिल्या फेरीत २७ मते जास्त मिळाली. अपक्ष आणि छोट्या पक्षांची २९ मते होती

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या