29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन

एकमत ऑनलाईन

डोंबिवली : शिवसेनेचे परळ लालबाग विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवलीत निधन झाले. विशेष म्हणजे दुस-या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. देसाई यांच्यावर डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, व्हेंटिलेटर नसल्यानं रुग्णलयाने देसाई यांना दुस-या रुग्णालयात हलविण्यास कुटुंबियांना सांगितले. मात्र, दुस-या रुग्णालयात देसाई यांना घेऊन जात असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली. यानंतर रुग्णवाहिका ढकलण्याची वेळ देसाई कुटुंबीयांवर आली.

शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील एका हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. त्यानंतर देसाई कुटुंबियांनी मंजुनाथ शाळेपर्यंत रुग्णवाहिका ढकलत न्यावी लागली. या पार्श्वभूमीवर देसाई यांचा मुलगा ऋषिकेश यानं साई पूजा रुग्णवाहिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचं सांगितलं.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या