28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेतल्या फुटीला आम्हीच जबाबदार; आदित्य ठाकरेंची कबुली

शिवसेनेतल्या फुटीला आम्हीच जबाबदार; आदित्य ठाकरेंची कबुली

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतल्या फुटीला मी आणि उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची कबुली आदित्य ठाकरेंनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी पाठीमागून वार केले, अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. शिवसेनेतल्या फुटीची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न त्यांना विचारला असता, आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मी त्याची जबाबदारी घेतो. मी आणि माझे वडील उद्धव ठाकरे आम्ही या फुटीला जबाबदार आहोत. कारण आम्ही त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आपलं मानलं.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आम्हाला वाटले की ते आमच्या सोबत राहतील. गेल्या ४०-५० वर्षांत मुख्यमंत्र्यांकडे राहिलेले नगरविकाससारखे महत्त्वाचे खाते दिले. जे इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधी पक्षातल्या नेत्यांना तडीपारीच्या नोटिसा दिल्या नाहीत. आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या