28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नाही

शिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नाही, हे कालच्या सभेने सिद्ध झाले आहे, असे शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. बुधवारी मुंबईतील नेस्को सभागृहात शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा पार पडला. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती.

कालच्या मेळाव्यानंतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. यावर भाष्य करताना अनिल परब म्हणाले, मनसेकडून फक्त इशारेच देण्याचे काम चालते. कालच्या मेळाव्याने शिवसेनेवर एकही ओरखडा आलेला नसल्याचे सिद्ध झाले आहे. कालच्या मेळाव्यावरून सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कोण काय टीका करतंय याकडे आमचे लक्ष नाही.

आमचे लक्ष कामाकडे आणि मुंबईकरांच्या सेवेकडे आहे. त्यामुळे त्यांना जे वाटते ते त्यांनी सांगितले, आम्हाला जे वाटते ते आम्ही सांगतो. ही राजकीय लढाई आहे. ती चालूच राहणार. खरी शिवसेना काय हे इलेक्शन कमिशन आणि कोर्टाला ठरवायचे आहे. खरी शिवसेना कोणती आहे हे काल लोकांनी बघितले आहे. त्यामुळे येत्या काळात याबाबत सर्व स्पष्ट होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या