मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हीडीओ फॉरवर्ड करून व्हायरल करणा-या दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे.
शीतल म्हात्रे यांनी हा व्हीडीओ मॉर्फ व्हीडीओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हीडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिका-यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसांत तक्रार केली होती.