18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeक्राइमश्रद्धा वालकर हत्याकांड : फॉरेन्सिक टीमचा लागणार कस

श्रद्धा वालकर हत्याकांड : फॉरेन्सिक टीमचा लागणार कस

एकमत ऑनलाईन

मुंबई : क्रूरतेचा कळस गाठत देशाला हादरवून सोडणा-या श्रद्धा वालकर या तरुणीच्या क्रूर हत्याकांडाचा तपास करणा-या पोलिसांसमोर आव्हानांच्या मालिका उभ्या ठाकल्या आहेत. हा क्रूर हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी विकृत आरोपी आफताब पुनावाला याला सहा महिन्यांचा काळ मिळाल्याने मृतदेहाचे तुकडेही कुजल्याने फॉरेन्सिक टिमचा पुरावे गोळा करताना कस लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे आफताबने श्रद्धाच्या शिरारापासून वेगळे केलेले तिचे मुंडके अद्याप पोलिसांना सापडलेले नाही.

फॉरेन्सिकची भूमिका मोलाची
आफताब विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना फॉरेन्सिक टीमवर अवलंबून राहावे लागणार आहे. दिल्ली पोलिसांची टीम त्याला तुकडे फेकलेल्या ठिकाणी नेत आहे. घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने रक्त पेशी, हाडांच्या आधारे पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. पोलिसांना एका ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत श्रद्धाचा हात आणि कमरेची काही हाडे सापडली आहेत. सोबतच फॉरेन्सिकची टीम फ्लॅटमधील प्रत्येक पुरावा गोळा करत आहे. यात रक्त पेशी, डीएनए, थुंकी, केसांचे अंश, ब्लड स्टेन, जंगल आणि आफताबच्या घरात सापडलेली माती. फ्रीजमधील नमुने यांच्या आधारावर तपास सुरु आहे.

सबळ पुराव्यांचा कसून शोध
आफताबने गुह्याची कबुली दिली असली तरी त्याला शिक्षेपर्यंत पोचविण्यासाठी सबळ पुरावे लागणार आहेत. त्यात आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर ६ महिन्यांमध्ये अनेकवेळा संपूर्ण फ्लॅट केमिकलच्या सहाय्याने धुतला आहे. ज्या फ्रिजमध्ये आफताबने श्रद्धाचा मृतदेह ठेवला होता, तो फ्रीजही अनेकदा साफ केला. शिवाय त्याने खोलीत फरफ्यूम आणि अत्तरांचाही मारा केला. त्यामुळे पोलिसांना श्रद्धाच्या रक्ताचे डाग शोधण्याचेही आव्हान कायम आहे.

पोलिस शोधतातय ती करवत
श्रद्धाला ठार मारल्यानंतर आफताबने तिच्या शरिराचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर केला होता. पण आफताबने वापरलेली ती करवत अद्याप दिल्ली पोलिसांना सापडलेली नाही.

मृतदेह फ्रीजमध्ये आणि दुस-या मुलीशी रोमांस
आफताब हा बम्बल अ‍ॅपवरून अनेक डेटिंग ग्रुपचा सदस्य होता. तो अनेकदा मुलींना दिल्लीतल्या फ्लॅटवर बोलवून संबंध ठेवायचा. याची माहिती श्रद्धाला मिळाली होती. त्यामुुळे दोघांत भांडणे होत होती. ज्या वेळी आफताबने श्रद्धाला ठार मारून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला होता, त्या नंतरही आफताबने बंम्बलवरून महिलांचा घरी बोलवत संबंध ठेवले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या अ‍ॅपकडून आता माहिती मागविली आहे. त्यातील महिला श्रद्धाच्या हत्येत सहभागी तर ना? याची पडताळणी पोलीस करत आहेत.

क्रूर हत्याकांडाची क्रोनॉलॉजी

श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी अटक आरोपी आफताब पुनावालाने दिल्ली पोलिसांना आपला कबुली जबाब दिला आहे. त्याने श्रद्धाच्या हत्ये पूर्वी आणि हत्येनंतर काय घडले याचा सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. हत्येच्या दीड आठवड्याआधीच श्रद्धाला मारण्याचा प्लॅन आफताबने बनवला होता. इतकेच नाही तर मृतदेह कसा आणि कुठल्या चॉपरने कापला जातो, हेही त्याने इंटरनेटवर शोधले होते. या सगळ्याबद्दल आफताबने स्वत: आता आपल्या कबुलनाम्यात माहिती दिली आहे. काय म्हणाला आहे आफताब?

– हत्येच्या दीड आठवड्याआधीच श्रद्धाची हत्या करायचा प्लान.
– श्रद्धा भावूक झाली. रडायला लागल्याने तिला सोडून दिले.
– फोनवर बोलत असताना श्रद्धा भांडायची.
– त्याचदिवशी हत्येचा विचार पक्का.
– तिला माझ्यावर संशय होता. त्यामुळे ती सारखी संतापायाची आणि वाद घालायची.
– १८ मी रोजी आमचे शेवटचे भांडण
– त्याच दिवशी श्रद्धाला संपविण्याचा प्लान.
– त्याचदिवशी तिची हत्या केली.
– मी घाबरलो होतो. मला माहित होते मी तिचा मृतदेह दहन केला पकडलो जाईल.
– मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मी इंटरनेटवर पूर्ण रात्र सर्च करत राहिलो.
– मृतदेह कसा आणि कुठल्या चॉपरने कापला जाते, हे मी इंटरनेटवर शोधले.
– क्राईमच्या वेबसीरिज पाहत होतो.
– त्यातूनच मृतदेह जतन करण्याची मला माहिती मिळाली.
– घटनेपूर्वी खरेदी केला ३०० लिटरचा फ्रीज.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या