श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील एका व्यवसायिक ईमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना श्रीनगर जिल्ह्यातील राजबाग येथे घडली असून गुरुवारी सकाळी आग लागली असल्याचे समोर आले आहे. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
सकाळी साधारण साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. या व्यवसायिक ईमारतीला आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. आग एवढी भीषण होती की धुराच्या लोटांनी आकाश व्यापून टाकले होते. त्यानंतर त्यांनी ईमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्याचे अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी सांगितले. सध्या ही आग नियंत्रणात असून, या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे अधिका-यांनी सांगितले. दरम्यान या कारवाईत अग्निशामक दलाचा एक जवान जखमी झाला असून, पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, असे अधिका-यांनी सांगितले आहे. तसेच सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे.