29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत हिरवी मिर्ची ७००, तर बटाटे २०० रुपये किलो

श्रीलंकेत हिरवी मिर्ची ७००, तर बटाटे २०० रुपये किलो

एकमत ऑनलाईन

कोलंबो : भारताचा शेजारी देश श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, येथील खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दरम्यान, श्रीलंकेच्या अ‍ॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटने चलनवाढीचा डेटा जारी केला आहे, ज्यामध्ये एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती १५ टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे भाज्यांच्या दरात झालेली प्रचंड वाढ असल्याचे सांगितले जात आहे. अ‍ॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटचा बाथ करी इंडिकेटर देशातील किरकोळ वस्तूंच्या चलनवाढीचा डेटा प्रसिद्ध करते. नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ दरम्यान खाद्यपदार्थांच्या महागाईत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल दिला आहे.

देशात आर्थिक आणीबाणी लागू
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असून लोकांना पोटभर अन्नही मिळत नाही आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमती पाहता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्यांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीतच खाण्यापिण्याची सुविधा मिळावी यासाठी लष्कराला अधिकार देण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या सुरुवातीपासून श्रीलंकेतील पाच लाख लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थ २२.१ टक्क्यांनी महागले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या