26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली

संजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते. मात्र, आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली.

ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक होते. पण तुरुंग प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. उद्धव ठाकरे यांना भेटीसाठी कोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश आर्थर रोड कारागृह प्रशासनाने दिले आहेत.

जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला द्यावं असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र यावर ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने नकार देत अशी भेट घेता येणार नाही त्यासाठी कोर्टाची परवानगी घेऊन या असा निरोप दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या