28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयसंतप्त नागरिकांनी आमदाराला धुतले

संतप्त नागरिकांनी आमदाराला धुतले

एकमत ऑनलाईन

चेन्नई : चिक्कमंगलुरुच्या हल्लेमने गावात हत्तीने महिलेला चिरडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुदिगेरेच्या भाजप आमदाराला बेदम मारहाण केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला.

हे आमदार महोदय हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबाची सांत्पना करण्यासाठी गेले होते. मात्र सतत होणा-या हत्तींच्या धुमाकूळावर प्रतिनिधी या नात्याने काहीही न केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आमदाराला चांगलाच चोप देत त्यांचे कपडे फाडले.
कुंधूर येथे हत्तीने केलेल्या हल्ल्यात ४५ वर्षीय शोभा यांना जीव गमवावा लागला होता. लोकांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या आमदार कुमारस्वामी यांना जमावाने घेरत हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा जाब विचारला. त्यावर उत्तर देऊ न शकल्याने संतप्त ग्रामस्थांनी आमदाराची यथेच्छ धुलाई करीत त्यांचे कपडे फाडले.

३ महिन्यांतील तिसरी घटना
गेल्या ३ महिन्यांतील तिस-यांदा अशी घटना घडली. पहिल्या वेळी हरगोडूमध्ये आनंद देवाडिगा नामक फॉरेस्ट रेंजरचा नंतर उरुबागे गावातील अर्जुन नामक व्यक्तीचा बळी गेला. आता शोभा यांचा बळी गेल्याने ग्रामस्थ भडकले.
———

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या