27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसंदीप पाठक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

संदीप पाठक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

एकमत ऑनलाईन

मुंबई : संदीप पाठक याची मुख्य भूमिका असलेला ‘राख’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चिला जात आहे. आता संदीपच्या पदरात आणखी एक यश पडले आहे. नुकत्याच झालेल्या जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संदीप पाठकला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते. आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे.

एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी आहे, असे संदीप म्हणाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या