21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसंपुर्ण राज्यातील रस्ते गुळगुळीत करा; सुमित राघवनची मुख्यमंत्री शिंदेंना विनंती

संपुर्ण राज्यातील रस्ते गुळगुळीत करा; सुमित राघवनची मुख्यमंत्री शिंदेंना विनंती

एकमत ऑनलाईन

मुंबई : घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्यांमुळे पहिला बळी गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिका-यांची बुधवारी चांगलीच कानउघाडणी केली. संभाव्य आपत्तीला तोंड देण्याकरिता सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले. त्यानंतर खड्डे भरण्याचे काम सुरू झाले.

दरम्यान, मराठी अभिनेत्याने रस्त्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत एक ट्विट केले आहे. जे सध्या चर्चेत आले आहे.
‘संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते गुळगुळीत करण्याचा आणि वर्षभर एकही खड्डा न पडून देण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. या सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे. दिलासा द्या,’ असे ट्विट एका नेटक-याने केले आहे. याच ट्विटला शेअर करत सुमीत राघवनने ट्विट केले आहे.

सुमित राघवनचे ट्विट
अनुमोदन. सीएमओ महाराष्ट्रा आमच्या हयातीत एकदा तरी संपूर्ण महाराष्ट्राचे रस्ते उत्कृष्ट प्रतीचे करण्याचे कष्ट ह्या सरकारने घ्यावेत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करावे अशी कळवळून विनंती करतो. या ट्विटमध्ये सुमीतने मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या