27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयसंसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ

संसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. आजच्या सत्रातही सुरुवातीलाच सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठीची मागणी आज सभागृहात लावून धरण्यात आली. त्यामुळे सभागृहात आजही जोरदार घोषणाबाजी आणि सरकारचा निषेध करण्यात आला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतरही विरोधक आक्रमक होते.

दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी खासदारांच्या निलंबनाची कार्यवाही योग्य असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाने संसदेच्या सत्रात गदारोळ घालू नये, ही निलंबनाची पहिलीच वेळ नसून, याआधीदेखील निलंबन करण्यात आले असल्याचे सभापती म्हणाले. मात्र, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेत कामकाज तहकूब करावे लागले. यावेळी सभापती व्यंकेया नायडू यांनी निलंबनाच्या कारवाईचे समर्थन करीत निलंबित खासदारांनी राज्यसभेत माफी मागावी, त्यानंतरच त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे नायडू म्हणाले.

आंदोलनात राहुल गांधी सहभागी
राज्यसभेच्या १२ सदस्यांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील सहभागी झाले होते. काळी पट्टी बांधत त्यांनी १२ खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या