22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeऔरंगाबादपाण्यासाठी महिलांचे पाण्याच्या टाकीवर ठिय्या आंदोलन

पाण्यासाठी महिलांचे पाण्याच्या टाकीवर ठिय्या आंदोलन

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, गुरूवार दि. १४ एप्रिल रोजी पुन्हा सकाळी सहा वाजता शहरातील पुंडलिकनगर जलकुंभावर महिलांनी धडक देत आंदोलन सुरू केले आहे. कमी दाबाने येणारे पाणी त्यातही दूषित पाणी यामुळे संतापलेल्या महिलांनी जलकुंभावर धडक दिली असून, ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजेच कालच सिडको येथील महिला आणि नागरिकांनी एन-५ येथील जलकुंभावर जाऊन आंदोलन केले होते.

शहरातील पुंडलिकनगर भागातील अनेक वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच पिण्यासाठी पुरवठा होणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. त्यामुळे अखेर आज सकाळी ६ वाजता पुंडलिकनगर भागातील महिला आणि नागरिकांनी पाणीच्या टाकीवर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग पाहायला मिळत आहे. तर अनेक भाजपचे पदाधिकारीसुद्धा या आंदोलनात सहभागी असल्याचे पाहायला मिळाले.

महिलांनी तोडले कुलुप
पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पुंडलिकनगर भागातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. मात्र, यावेळी आतमध्ये जाण्यासाठी कुलुप लावलेले होते. त्यामुळे संतप्त महिलांनी दगडाने ठोकून कुलुप तोडले आणि त्यानंतर जलकुंभाच्या परीसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. इतकंच नाहीतर काही नागरिक पाण्याच्या टाकीवरती जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर बनत चालला असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या