29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडासचिनची होणार बीसीसीआयमध्ये एन्ट्री?

सचिनची होणार बीसीसीआयमध्ये एन्ट्री?

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगातील महान फलंदाजांपैकी एक भारताच्या सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) मोठी जबाबदारी मिळू शकते. तेंडुलकरसोबतच सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे चेहरे आहेत. सध्या गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, तर द्रविडला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय लक्ष्मणला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख करण्यात आले आहे. मात्र सचिनला आतापर्यंत बीसीसीआयमध्ये कोणतीही जबाबदारी मिळालेली नाही. मात्र, आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी संकेत दिले आहेत, की तेंडुलकरही नव्या भूमिकेत दिसू शकतो.

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, द्रविडची मुख्य प्रशिक्षक आणि लक्ष्मणची एनसीए प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर सचिनलाही बोर्डात भूमिका मिळू शकते. यासाठी सचिनचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. सचिनला निवड समितीमध्ये भूमिका दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. त्याचवेळी सचिनकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या