23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयसणासुदीत लोडशेडिंगचे संकट!

सणासुदीत लोडशेडिंगचे संकट!

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रासह १३ राज्यांवर आधीची देयके न दिल्यामुळे लोडशेडिंगचे संकट उभे ठाकले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, मिझोराम, झारखंड, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांना आधीची बिले न भरल्याने पॉवर एक्स्चेंज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विजेची खरेदी आणि विक्री करता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विजेची खरेदी-विक्री न करता आल्यामुळे विजेचा तुटवडा भासला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने बिल न भरणा-या डिसकॉम आणि जेनको यांच्याबाबत केलेल्या नियमांमुळे या राज्यांना विजेचा तुटवडा जाणवू शकतो. १९ ऑगस्टपासून ऊर्जा मंत्रालयाचा लेट पेमेंट सरचार्ज म्हणजेच एलपीएस नियम लागू होणार आहे. एलपीएस नियमानुसार डिसकॉमनी मागच्या ७ महिन्यांचे बिल जेनकोंना दिले नाही तर त्यांना पॉवर एक्स्चेंज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वीज खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. या नियमामुळे १३ राज्यांच्या डिसकॉमवर कारवाईची टांगती तलवार आहे.

डिसकॉमकडून मोठ्या प्रमाणावर बिले भरली न गेल्यामुळे निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.१३ राज्यांवरच्या कारवाईच्या टांगत्या तलवारीचा फटका इंडियन एनर्जी एक्स्चेंजला शेअर मार्केटमध्येही बसला आहे.आयईएक्सच्या शेअरमध्ये गुरुवारी ३.६ टक्क्यांची घसरण होऊन तो बीएसईमध्ये १६६.३५ रुपये प्रती शेअरवर बंद झाला.

एक डझनपेक्षा जास्त राज्यांची बिले अजूनही भरण्यात आलेली नाहीत. हे पहिल्यांदाच होत आहे, असेही सूत्रांनी सांगितले. याआधाही काही राज्यांवर कारवाई झाली, पण त्यांनी पैसे दिल्यानंतर लगेचच त्यांच्यावर निर्बंध हटवण्यात आले होते. काही राज्यांनी विनंती केल्यानंतर विजेच्या खरेदी-विक्रीवरच्या निर्बंधांवरची कालमर्यादा वाढवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. या १३ राज्यांचे जवळपास ५,०८५ कोटी रुपयांचं बिल देणे बाकी आहे.

कोणत्या राज्याचं किती बिल बाकी?
महाराष्ट्र ३८१.६६ कोटी

तेलंगणा १,३८० कोटी

तामिळनाडू ९२६.१६ कोटी

राजस्थान ५००.६६ कोटी

जम्मू-काश्मीर ४३४.८१ कोटी

आंध्र प्रदेश ४१२.६९ कोटी

कर्नाटक ३५५.२० कोटी

मध्य प्रदेश २२९.११ कोटी

झारखंड २१४.४७ कोटी

बिहार १७३.५० कोटी

छत्तीसगड २७.४९ कोटी

मणीपूर २९.९४ कोटी

मिझोराम १७.२३ कोटी

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या