25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसत्तासंघर्षाबाबत तारीख पे तारीख

सत्तासंघर्षाबाबत तारीख पे तारीख

एकमत ऑनलाईन

अनिश्चितता कायम, सुनावणीला मुहूर्तच मिळेना
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. या प्रश्नी उद्या (मंगळवारी) सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या कामकाजाच्या विषयांमध्ये याचा समावेश नाही. त्यामुळे उद्या या प्रश्नी सुनावणी होणार की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कोणतेही मोठे कारण नसताना आणि आता नवे सरन्यायाधीश मिळालेले असताना ना घटनापीठ स्थापन केले जात आहे, ना सुनावणीवर विचार केला जात आहे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात उद्या दोन स्वतंत्र घटनापीठ काम पाहणार आहेत. मात्र शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादासंदर्भातील याचिकांचा त्यात सुनावणीसाठी समावेश नाही. गुरुवारपर्यंत तातडीच्या सुनावणीसाठी कोणतेही प्रकरण थेट खंडपीठाकडे सादर करू नका, असा आदेश नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला आहे. तातडीच्या प्रकरणांची माहिती रजिस्ट्रारकडे द्यावी, ते देतील त्या तारखेला सुनावणी होईल, असे निर्देशही सरन्यायाधीश उदय लळीत यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद मागच्या महिन्यापासून रखडला आहे. सातत्याने सुनावणीची तारीख लांबवली जात आहे. सत्तासंघर्षावर या आधी सर्वोच्च न्यायालयात २३ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. त्या आधी ४ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, २२ ऑगस्ट रोजी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सुरुवातीला सुनावणी झाली, तेव्हा घटनापीठाचा मुद्दा मांडला गेला. परंतु त्यावर नुसताच विचार झाला आणि ऐनवेळी थेट सुनावणीची अपेक्षा असताना घटनापीठाचा मुद्दा उपस्थित करून पुन्हा तारीख वाढवून देण्यात आली.

नवे सरन्यायाधीश आले,
पण सुनावणी होईना
या अगोदरचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी हा खटला मनावर घेतला होता. परंतु ते निवृत्त होईपर्यंत सुनावणी लांबत गेली. आता नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पदभार स्वीकारला आहे. परंतु अजूनही त्यावर सुनावणीबाबत निर्णय होत नाही. सातत्याने तारीख पे तारीख आणि आता सुनावणीच अनिश्चित स्थितीत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या