26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसध्यातरी मनसे बरोबर युती नाही

सध्यातरी मनसे बरोबर युती नाही

एकमत ऑनलाईन

पुणे : मनसे बरोबर युती करण्याबाबत सध्या कोणतीही ठोस चर्चा झाली नाही असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.ते सध्या पुणे जिल्ह्याच्या र्दौ­यावर आहेत काल त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आणि कार्यकर्त्यासमवेत चर्चा केली .तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार संघ बांधणी साठी प्रयत्न सुरू केले .

आज त्यांनी पिंपरीचिंचवड भागाचा दौरा केला त्यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते .ते म्हणाले ,सध्या तरी युतीबाबत ठोस चर्चा झाली नाही पण आगामी काळात चर्चा होण्याचे संकेत त्यांनी दिले.

आमचा पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर राहणार आहे असे ते म्हणाले. कोंग्रेस पक्षाच्या भारत जोडो आंदोलनाबाबत ते म्हणाले या आंदोलनाचा काही उपयोग होणार नाही गरजेच्या वेळी कोंग्रेस पक्षाने आवश्यक गरजा पूर्ण केल्या नाहीत .

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या