23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडासनरायझर्सचा विजयी चौकार

सनरायझर्सचा विजयी चौकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ मधील सलग चौथा विजय साकारला. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या १५२ धावांचे लक्ष्य हैदराबादने ३ विकेटच्या बदल्यात पार केले. या विजयासह ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.

पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार केन विलियम्सन फक्त ३ धावांवर माघारी परतला. पण त्यानंतर सलामीवीर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांनी डाव सावरला. या दोघांनी संघाचे अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी जम बसवत असतानाच फिरकीपटू राहुल चहरने दोघांना माघारी पाठवले. त्याने प्रथम त्रिपाठीला ९ व्या षटकात ३४ धावांवर तर ११ व्या षटकात अभिषेकला ३१ धावांवर बाद केले. या दोन फलंदाजांच्या जागी आलेल्या एडम मार्करम आणि निकोलस पूरन यांनी विजयाची औपचारीकता पूर्ण केली.

त्याआधी केन विलियम्सनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी पंजाबच्या फलंदाजांना मोठी भागिदारी करू दिली नाही. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन वगळता अन्य फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. त्याने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांसह ६० धावा केल्या. पंजाबने नियमित अंतराने विकेट गमावल्या. मयांक अग्रवाल दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने शिखर धवन नेतृत्व करत आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून फलंदाजांना दबावात ठेवले. लियाम वगळता अन्य कोणाला धावा करण्याची संधी दिली नाही. शाहरुख खानने २६ धावा केल्या. पण त्यासाठी त्याने २८ चेंडू घेतले.

उमरान मलिकने टाकलेल्या अखेरच्या षटकात शेवटच्या ३ चेंडूवर ३ विकेट घेतल्या. पण त्यातील अखेरची विकेट ही धावबाद होती. त्यामुळे त्याची हॅट्ट्रिक झाली नाही. पंजाबच्या अखेरच्या ४ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. उमरानने ४ षटकात २८ धावा देत ४ विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारने २२ धावात ३ तर टी नटराजन आणि जगदीशा सुचित यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात भुवीने आयपीएलमधील १५० विकेट पूर्ण केल्या.

उमरानची उत्कृष्ट कामगिरी
आयपीएलमध्ये एखाद्या गोलंदाजाने दोन बोल्ड आणि स्वत:च्या गोलंदाजीवर दोन कॅच घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी हरभजन सिंग याने २०११ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यानंतर उमरानने अशी कामगिरी केली आहे. इतकच नाही तर आयपीएलच्या इतिहासात अखेरच्या षटकात एकही धाव न देणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या