24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीसभापतींच्या दालनात मालमत्ता प्रश्­नी २० एप्रिलला बैठक

सभापतींच्या दालनात मालमत्ता प्रश्­नी २० एप्रिलला बैठक

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी महानगरपालिका हद्दीतील शैक्षणिक संस्थांना महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराबाबत दिलेल्या बेकायदेशीर नोटीसांसंदर्भात विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दि. २० एप्रिल रोजी मुंबईत विधीमंडळातील स्वत:च्या दालनात खास बैठक बोलावली असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संस्था महामंडळाचे सरकार्यवाह माजी आमदार ऍड. विजय गव्हाणे यांनी दिली.

परभणीतील बहुतांशी शैक्षणिक संस्थांना महापालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपूर्वी मालमत्ता करांसंदर्भात लाखो रुपयांच्या नोटीसा बजावल्या. या नोटीसा पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा दावा करीत शैक्षणिक संस्था चालकांनी न्यायालयात धाव घेतली. या स्थितीतसुध्दा महापालिका प्रशासनाने परभणीतील काही शैक्षणिक संस्थांना मालमत्ता कर थकविल्याबद्दल चक्क टाळे ठोकले. कहर म्हणजे न्यायालयाचा स्थगिती आदेश असतांनासुध्दा महापालिका प्रशासनाने या पध्दतीने कारवाई केली.

त्याचे साद-पडसाद विधानपरिषदेत जोरदारपणे उमटले. सभापती निंबाळकर यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली. खुलासे मागविले तेंव्हा महापालिका प्रशासनाने खोटीनाटी माहिती विधानपरिषदेस सभागृहास पुरविली. त्यामुळे सभापती निंबाळकर, संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधी अक्षरश: संतापले. या पाश्र्­वभूमीवर आता सभापतींच्या दालनात २० एप्रिल रोजी बैठक होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या